ताज्या घडामोडी

महाराष्ट्र विधानपरिषदेला सर्वांना सोबत घेऊन जाणारा अनुभवी उपसभापती लाभला ; दिपकआबा साळुंखे-पाटील

दिपकआबांचे जिव्हाळ्याचे स्नेही नूतन उपसभापती सचिन आहीर यांचा सत्कार

सांगोला / विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 

विधानपरिषद हे राज्याचे वरिष्ठ सभागृह आहे. राजाच्या विकासाला गती आणि दिशा देण्यासाठी या सभागृहाचे महत्त्वाचे योगदान असते. या सभागृहाला अनुभवी, योग्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा उपसभापती लाभला असे गौरवद्गार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी काढले. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सचिन आहीर यांचा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते विधानपरिषद उपसभापती दालनात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, सचिन आहीर यांच्यासोबत मी गेली अनेकवर्षे सोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन आहीर यांच्यासारख्या अनुभवी, अभ्यासू आणि संयमी लोकप्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान झाल्याने सभागृहाला सक्षम नेतृत्व लाभले आहे. संसदीय परंपरा जपत सर्वपक्षीय सदस्यांना समान न्याय देत ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा मला विश्वास आहे. विधानपरिषदेचे कामकाज सुरळीत, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख ठेवण्यासाठी उपसभापतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सचिन आहीर यांचा राजकीय अनुभव, प्रशासनाचा अभ्यास आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती राज्याच्या संसदीय कामकाजाला निश्चितच बळ देणारी ठरेल त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी दीन दलीत आणि अल्पसंख्यांक वर्गाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. 

सत्काराला उत्तर देताना नूतन उपसभापती सचिन आहीर यांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार मानले. राज्याच्या हिताला प्राधान्य देत, सभागृहाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी निष्पक्षपणे आणि जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??