ताज्या घडामोडी
डिकसळ चा ग्रामसेवक लईच भारी…. पण त्या कर्मचाऱ्याची चालच न्यारी. दलितवस्ती मध्ये, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याकडून पाणी सोडण्यास दुजाभाव.

सांगोला/विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
सांगोला तालुक्यातील डिकसळचा ग्रामसेवक श्री.सुनिल साळुंखे तसा लय’च भारी परंतु त्या कर्मचाऱ्यांची चालच न्यारी….अशी परिस्थिती त्या ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पाणी शिल्लक असेल, त्या दिवशी दलितवस्ती नळाला पाणी सोडण्यास दुजा भाव केला जात आहे, नळाला पाणी अगोदर गावात सोडले जाते, नंतर कमी पाणी दलितवस्तीमध्ये जाणूनबुजून दिले जाते,याकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष असल्याने कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे, अशी चर्चा त्या नागरीकामधूंन होत आहे.तरी ग्रामसेवक यांनी लक्ष घालून गावात प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



