ताज्या घडामोडी

घेरडी बीटमध्ये बेकायदेशीर धंद्यांना अभय कोणाचे?  हप्त्यांच्या चर्चेला उधाण; कारवाई मात्र कागदावरच? फोन उचलण्यासही टाळाटाळ होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप!▪️भाग.नं.3▪️

सांगोला विशेष प्रतिनिधी

विकास गंगणे 

मो.9881583935

 

सांगोला तालुक्यातील घेरडी बीटअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये बेकायदेशीर धंद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावागावांत बेकायदेशीर दारू विक्रीसह इतर अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असताना, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेपर्यंत नागरिकांनी तक्रारी पोहोचविण्याचा प्रयत्न केला, तरी संबंधित अधिकाऱ्यांचे फोन लागत असूनही फोन उचलले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपली व्यथा नेमकी कोणाकडे मांडायची, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

‘हप्त्याला आधी, कारवाईला नंतर’ अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा!

 

घेरडी बीट परिसरात काही बेकायदेशीर व्यवसायांबाबत नियमित आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार होत असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, या कथित व्यवहारांमध्ये तथ्य आहे की नाही, याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे. जर अशा प्रकारचे व्यवहार होत असतील, तर त्यामागे कोणाचे पाठबळ आहे आणि कारवाईला विलंब का होत आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे.

 

कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनेच तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

 

 

आता ग्रामस्थांचा सवाल एकच!

 

घेरडी बीटमध्ये जबाबदार अधिकारी नागरीकांचे फोन घेत नाहीत.व बेकायदेशीर धंद्यांवर ठोस कारवाई कधी होणार? कथित हप्त्यांच्या चर्चेची वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का? नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जबाबदार अधिकारी उपलब्ध होणार का? की ग्रामस्थांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार?

 

या सर्व प्रश्नांवर वरिष्ठ पोलीस प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

▪️भाग नं.४ उद्या वाचा.▪️

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??