ताज्या घडामोडी

पोस्ट ऑफिस प्रशासनाविरोधात विठ्ठल शिंदे आक्रमक! रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त खिडकीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

सांगोला : विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.९८८१५८३९३५

 

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता तात्पुरती अतिरिक्त खिडकी सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल भैय्या शिंदे यांनी पोस्ट ऑफिस प्रशासनाला निवेदन दिले.

 

राख्या व पार्सल पाठविण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, मर्यादित खिडक्यांमुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने तातडीने अतिरिक्त खिडकी सुरू करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

 

“सणाच्या काळात नागरिकांना सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मागणीची दखल न घेतल्यास पोस्ट ऑफिस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा विठ्ठल भैय्या शिंदे यांनी दिला.

 

या वेळी निलेश लामगुंडे,हर्षद शिंदे, साहिल महांकाळ,हार्दिक महांकाळ,गणेश अलदर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा विठ्ठल भैय्या शिंदे यांचा हा पुढाकार असून, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सांगोला शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

चौकट : पोस्ट कार्यालयातील सर्व्हरचा सावळा गोंधळ

 

सर्व्हर डाऊनचा फटका; नागरिकांचा वेळ वाया

 

पोस्ट कार्यालयात वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तासन्तास प्रतीक्षा करूनही कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात वाढलेली गर्दी लक्षात घेता सर्व्हरची तांत्रिक समस्या तातडीने दूर करून सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??