ताज्या घडामोडी

सांगोला बसस्थानकात लुटमारीच्या वाढत्या घटना; शौचालय असूनही उघड्यावर लघुशंका; वाढते घाणीचे साम्राज्य 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 सांगोला येथील बसस्थानक मोठे बसस्थानक आहे. या बसस्थानकातून दररोज शेकडो बसेस ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांची येथे नेहमीच वर्दळ असते. प्लॅटफॉर्म असलेल्या या बसस्थानकात प्रवाशांकरिता बैठकव्यवस्था उत्तम करण्यात आलेली आहे, मात्र येथे रात्री-अपरात्री चोरटे, तळीरामांचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

विशेषतः महिलांच्या पर्स, गळ्यातील दागिने, मोबाईल लुटीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक चोरींच्या घटनांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सांगोला 

 बसस्थानक नेहमी सुरू असते. बसस्थानकाच्या बाजूस मोठी सुलभशौचालयाची इमारत आहे. परंतु या ठिकाणी जायला प्रवाशांना वेळ मिळत नसल्याने उघड्यावरच लघुशंका केली जात आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे लघुशंकेचा दुर्गंध दिवसभर प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आहे. या ठिकाणी केवळ काही ठिकाणी नळच चालू असतात, तर इतर नळ बंद करण्यात आलेले आहेत.

असे प्रवाशांमधून बोलले जात आहे.तसेच 

प्रवासी याठिकाणी गुटखा, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारत असल्याने अस्वच्छता दिसून येत आहे. प्रवेशव्दारात कचरा, सांडपाणी साचत असल्याने बसस्थानक

समस्यांच्या विळख्यात अडकले गेले आहे. येथे प्रवाशांची लूटमार होऊ नये म्हणून पोलिस चौकी आहे. मात्र, येथे पोलिस कर्मचारी थांबत नसल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे विशेषतः महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने, पर्सची चोरी करत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. येथे आलेले प्रवासी वाहनतळावर वाहने न लावता बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या व्यापारी

गाळ्यांच्यासमोर दुचाकी वाहने लावत असल्यामुळे व्यापारी, दुकानदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

राज्य सरकारने महिलांना प्रवासात सवलत योजना सुरू केली आहे, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरू आहे. यामुळे महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे, तर ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. या वाढत्या प्रवाशांना योग्य

आगाराच्या नाकावर टिच्चून अवैध प्रवाशी वाहतूक होत आहे. बसस्थानकासमोरच रस्त्यावर अवैध प्रवाशी वाहने उभी राहतात. येथून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक होत आहे. एसटी महामंडळाच्या डोळ्यादेखत त्यांच्या नाकावर टिच्चून होत असलेली अवैध प्रवाशी वाहतूक थांबवायची असेल तर एसटी महामंडळाने बसस्थानकातून बसेस वेळेवर सोडणे, प्रवाशी विश्रांती कक्ष स्वच्छ ठेवणे, प्रवाशांना सुरक्षा पुरविणे, चोऱ्यामाऱ्या रोखणे गरजेचे झाले आहे.

 

ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच आम्हा कामगारांना ताटकळत बसावे लागते. त्याचबरोबर येथील बसस्थानकात अस्वच्छता जास्त असल्यामुळे डासांचा त्रास अधिक जाणवतो. बसस्थानक तळीरामांचा अड्डा बनत आहे, तर बसस्थानकात लुटमारीच्या घटना घडत असल्याचे चित्र दिसून येते. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. 

 

◼️विजय बाबर, प्रवासी

विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी महीला वयोवृद्ध ◼️

 

सेवासुविधा पुरविण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??