ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणारे विश्वास यादव सर; वाढदिवसानिमित्त कौतुकाची थाप

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

डिकसळ, ता. सांगोला : जिल्हा परिषद शाळा, डिकसळ येथे कार्यरत असलेले शिक्षक मा. विश्वास यादव सर यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत असून, त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.

 

विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत यादव सर मनापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगताना त्यांच्यातील जिज्ञासा वाढविणे, अभ्यासाची गोडी निर्माण करणे तसेच शिस्त, संस्कार आणि चांगल्या सवयी रुजविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पालक व ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.

 

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. ही भूमिका विश्वास यादव सर आपल्या कार्यातून जपत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रेमळ आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्येही त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे.

 

डिकसळ गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला योग्य दिशा मिळावी, यासाठी यादव सरांचे योगदान कौतुकास्पद असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत आज वाढदिवसानिमित्त विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.

 

विश्वास यादव सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक यश लाभो, हीच सदिच्छा.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??