ताज्या घडामोडी

भक्तीबरोबरच गोरगरिबांच्या मदतीला सदैव धावणारे राजकुमार गुजर मामा

बाळूमामांचे भक्त व पुजारी म्हणून धार्मिक उपक्रमांसह सामाजिक सेवेतही योगदान..

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

 श्री संत बाळु मामा मंदिर 

 हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ जि.सांगली येथील मा. राजकुमार गुजरमामा हे बाळूमामांचे भक्त तथा पुजारी म्हणून परिसरात परिचित असून, भक्तीबरोबरच गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गरजू व्यक्तीला आपल्या परीने सढळ हाताने मदत करणे, अडचणीच्या काळात आहोरात्र धावून जाणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा पैलू मानला जातो.

राजकुमार गुजर मामा यांच्या घरासमोरील अंगणात बाळूमामांचे मंदिर उभारण्यात आले असून, या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः श्रावण महिन्यात भजन, कीर्तन, गजीढोल यांसह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. कार्यक्रमानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न केला जातो.

बाळूमामांच्या भक्तीला सामाजिक सेवेची जोड देत राजकुमार गुजर मामा हे गरजू आणि गोरगरीब नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येतात. कोणत्याही व्यक्तीला अडचण निर्माण झाल्यास आपल्या परीने मदतीचा हात देण्याची त्यांची भूमिका असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. त्यामुळे धार्मिक कार्यासोबतच माणुसकीची सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

श्रावण महिन्यात मंदिर परिसरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमुळे हिंगणगावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. भजन-कीर्तनातून अध्यात्मिक विचारांचा प्रसार, गजीढोलसारख्या पारंपरिक कार्यक्रमांतून धार्मिक उत्साह आणि प्रसादातून भक्तांमध्ये आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या उपक्रमांमुळे मंदिर परिसर हा केवळ धार्मिक स्थळ न राहता भाविकांच्या एकत्र येण्याचे ठिकाण बनत आहे.

 

‘भक्ती ही केवळ देवाच्या चरणी न राहता ती माणसांच्या सेवेतही उतरली पाहिजे,’ या भावनेतून राजकुमार गुजर मामा धार्मिक कार्यासोबत गरजूंच्या मदतीला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येते. त्यांच्या या कार्यामुळे बाळूमामांच्या भक्तांमध्येही सेवाभावाची भावना वाढीस लागण्यास मदत होत आहे.

 

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, भाविकांना प्रसादाचे वाटप, गोरगरीबांना मदतीचा हात आणि अडचणीच्या काळात धावून जाण्याची वृत्ती यामुळे राजकुमार गुजर मामा यांची भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम हिंगणगाव परिसरात पाहायला मिळत आहे. गुजर मामा हे कोणत्याही भक्तांकडून कोणत्याही प्रकारचा निधी किंवा देणगी न घेता मामांच्या सदैव सेवेत असतात आणि मामाने दिलेल्या वचनाचे पालन करतात मामानं दिलेलं वचन माझा भंडारा लावून कोणासमोर भीक मागू नकोस हे वचन मामाने माझ्याकडू जागृत अवस्थेत घेतलेले आहे आणि त्या वचनाला न गालबोट लावता मी इथून पुढे निरंतर सेवा करीन..

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??