ताज्या घडामोडी

२५ वर्षांच्या सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत दमदार एन्ट्री 

साळुंखे पाटील परिवारातील तिसऱ्या पिढीचा जिल्हा बँकेत दणक्यात प्रवेश 

सांगोला ; विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

 

सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी जवळा ता. सांगोला येथील सूर्यादित्य उर्फ यशराजे दिपकआबा साळुंखे पाटील यांची वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी भरघोस मतांनी निवड झाली आहे. यापूर्वी यशराजे यांचे आजोबा स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी १० वर्षे तर यशराजेंचे वडील माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तब्बल १८ वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम पाहिले होते. 

नूतन संचालक सूर्यादित्य उर्फ यशराजे दिपकआबा साळुंखे पाटील यांचे शुक्रवार दि २७ नोव्हेंबर रोजी साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगोला शहरात जोरदार स्वागत करत फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करून विजयाचा आनंद साजरा केला तर जवळा ता सांगोला येथे जंगी मिरवणूक काढून नूतन संचालक सूर्यादित्य उर्फ यशराजे दिपकआबा साळुंखे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. 

भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष पुरस्कृत सहकार विकास पॅनलने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या नेतृत्वात एकूण १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १९ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर ९ जागांसाठी निवडणूक पार पडली या ९ पैकी ८ जागा मोठ्या फरकाने जिंकून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. 

 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी पार पडलेल्या निवडणुकीत दूध संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून ३०५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला यापैकी ३ मते अवैध ठरली उर्वरित ३०२ पैकी सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील यांनी विक्रमी १९४ मते मिळवली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारास केवळ १०८ मते मिळाली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दूध संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून सूर्यादित्य उर्फ यशराजे दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तब्बल ८६ मतांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्या या विजयामुळे साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमधून विजय उत्सव साजरा केला जात आहे. 

 

 

 

🛑सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही🛑

 

सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे सर्वच नेतेमंडळीनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला जिल्हा बँकेत काम करण्याची संधी दिली. तसेच दूध उत्पादक संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवला त्याबद्दल सर्व नेतेमंडळी, मतदारांचे तसेच माझ्यावर व माझ्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीचे काम येणाऱ्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक म्हणून पार पाडेन 

 

सूर्यादित्य दिपकआबा साळुंखे 

नूतन संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??