सांगोला तालुक्यातील सातबारा दुरुस्तीसाठी येणाऱ्या नागरिकांना उडवा उडवी ची उत्तरे. खरेदी विक्री होऊन देखील,सहा महीन्यापासून ७/१२ सदरी नोंदणीच नाही.
नूतन तहसीलदार साहेब यांनी लक्ष देण्याची गरज, शेतकऱ्यांमधून चर्चा

विकास गंगणे/विशेष प्रतिनिधी
मो.9881583935
मोठा गाजावाजा करत शासनाने सातबारा ऑनलाईन केले परंतु हे सर्व कामकाज करत असताना महसुल विभागाकडून मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या चुका सातबारा अपडेट करताना झाल्यामुळे त्याचा फटका अनेक जमीन मालकांना,शेतकऱ्यांना व नागरिकांना सध्या बसत आहे.
पूर्वापार चालत आलेल्या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे सरकारी काम सहा महिने थांब.! अशी सरकारी कामकाजाची पद्धत असताना सांगोला तालुक्यात मात्र यापेक्षाही लाजिरवाणा प्रकार आहे की, सातबारा दुरुस्तीसाठी सरकारी काम वारंवार अजून जरा थांब आणि अजून जरा थांब.! असे म्हणत मोठ्या प्रमाणात नागरिकांना हेलपाटे लावून त्रास दिला जात असल्यामुळे सातबारा उतारा स्वतःच्या मालकीचा असणे ही नागरिकांना डोकेदुखीच बनली असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील डिकसळ गावात जमिनी खरेदी विक्री होऊन सहा महीने झाले तरी,७/१२ वर जमिनी खरेदी घेणाऱ्यांची नावेच नाहीत, हे मात्र मोठी बाब म्हणावं लागेल, परंतु हा शेतकरी तलाठी कार्यालयात सहा महीन्यापासून तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे,तरी पण त्या शेतकऱ्याची नोंद सातबारा सदरी झाली नाही, अशी परिस्थिती अनेक गावात आहे याची दखल तहसीलदार साहेबांनी वेळीच घ्यावी अशी चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व नागरिकांमधून होत आहे.
सातबारा ऑनलाईन करत असताना महसूल विभागाकडून संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले हे करत असताना अनेकांच्या नावातील मोठ्या प्रमाणात झालेल्या त्रुटी क्षेत्रातील फरक, क्षेत्रातील तफावत व इतर नोंदणींमध्ये प्रचंड चुका करण्यात आल्या व त्यानंतर विविध कामानिमित्त नागरिकांना सातबारा आवश्यक असल्याने ऑनलाईन सातबारा पाहिल्यानंतर महसूल विभागाने केलेल्या चुकांमुळे नागरिकांना कमालीचे हैराण केले आहे .जमिनीची खरेदी विक्री करणे, बँकेत तारण म्हणून जमीन देणे तसेच नावे कमी करणे यासोबत इतर कामांसाठी सातबारा वरील नोंदणी योग्य असणे गरजेचे आहे त्यामुळे सातबारा वरील बारीकसारीक चुका ह्या कामासाठी अडचणीच्या ठरत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सातबारा दुरुस्तीसाठी संबंधित गावचा तलाठीकडे नागरिकांना सातबारा दुरुस्ती करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत सातबारा दुरुस्तीचे अधिकार आमच्याकडे नाहीत असे संबंधित तलाठी यांच्याकडून सांगण्यात येते तहसीलदार यांच्या अधिकारातील सातबारा दुरुस्ती केली जाते हे जरी खरे असले तरी सर्व कागदोपत्री प्रक्रिया मात्र तलाठी व मंडल अधिकारी यांच्या मार्फत केली जाते अनेक वेळा नागरिकांनी अर्ज दाखल केल्यानंतर सातबारा दुरुस्तीसाठी तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे वारंवार हेलपाटे मारून ही सातबारा मध्ये नावाची दुरुस्ती असो क्षेत्र दुरुस्ती असो वेळेत ही कामे होत नसल्याने सांगोला तहसील कार्यालयाबाबत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि सातबारा उताऱ्याचे खातेदार यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे.