लोकांनी मला निवडून द्यायचं ठरवलंय… सौ.संगिता ताई मोटे

सांगोला/ विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी जिल्हा परिषद निवडणूक साठी ,माजी उमेदवारी असून आपण निवडणूक लढवत आहोत. लोकांनी मला निवडून द्यायचं ठरवलंय. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांनाही या निवडणुकीत विजयी करावं, असं आवाहन जणतेच्या मनातील, व महीलांच्या मार्गदर्शिका घेरडी गावच्या सौ. संगिता ताई सोमा मोटे यांनी केलं आहे.
सौ. संगिता ताई म्हणाल्या, घेरडी ऐतिहासिक भूमी
आहे. या घेरडीच महत्व आणि वैभव खूप मोठं आहे. रस्ते, गटारी, आरोग्य, पाणी पुरवठा या सुविधा निर्माण करण्याबरोबर नागरिकांच्या हिताचे निर्णय, घेतले जावेत, यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. यापूर्वी जो शब्द मतदारांनी दिला, तो पूर्ण करणार आहे. असं सांगत त्या म्हणाल्या, सामान्यातल्या सामान्य नागरिकांची कामं झाली पाहिजेत. कराचा बोजा जादा पडता कामा नयेत, सुविधा निर्माण करुन देऊ, यासाठी आम्हाला विजयी करावं.



