घर घर संविधान कार्यक्रम उत्साहात साजरा

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत जि.प.प्रा. शाळा भिमनगर सांगोला येथे दि.1/1/2026 रोजी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेळके मॅडम यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी शाळेमध्ये ॲड.सागर बनसोडे सर यांचे व्याख्यान आयोजित कले. यांनी आपल्या व्याख्यानद्वारे संविधान सभा निर्मिती ,निर्मिती समिती,भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य व हक्क याबाबत विद्यार्थी व पालक यांना प्रेरणा देणारे व्याख्यान केले. ज्येष्ठ समाजसेवक आयु. बाळासाहेब बनसोडे सर यांनीही भारतीय संविधान विषयी जाणीव जागृती याबाबत आपले विचार व्यक्त केले. इरफान फारुकी भाई यांनी आपल्या विचारातून भारतीय संविधानामुळे आपल्याला शिक्षण,नोकरी, व्यवसाय या प्रत्येक ठिकाणी समान संधी दिली आहे हे संविधानातील मूल्यांची माहिती दिली. समाजसेवक आयु. बापूसाहेब ठोकळे सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज का आहे व शिक्षण घेतलेच पाहिजे याविषयी संविधानातील प्रमुख मूलभूत हक्क व कर्तव्य,महिलांसाठी कायदा यावर सखोल मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित नगरसेविका श्रीम. गोदाबाई बनसोडे ह्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. यावेळी यांचा आयु. बापूसाहेब ठोकळे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते भारतीय संविधान भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी आयु.बापूसाहेब ठोकळे,आयु. बाळासाहेब बनसोडे, आयु. ॲड. सागर बनसोडे, संगीत तज्ञ आयु. सोमनाथ जगधने, इरफान फारुकी भाई लक्ष्मण घनसरवाड,रोहिदास गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. कोमल ठोकळे,उपाध्यक्ष मंजुषा बनसोडे, अंगणवाडी सेविका जयंती ताई बनसोडे व लक्ष्मी बनसोडे शा. व्य. समिती सदस्य सुरेखा रणदिवे, नीता वाघमारे, स्वाती साठे, पालक वर्ग व विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.शाळेच्या शिक्षिका श्रीम.मैना गायकवाड मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.


