ताज्या घडामोडी

सांगोला वनविभागाकडून, मोठी कामगिरी,

घेरडीचा पिंटू सुतारचा विना परवाना वृक्षतोड वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.9881583935

 

विनापरवाना वाहतुक टेम्पो क. MH 45 AF 1123 कडूलिंब जळावु लाकुड मालासह टेम्पो जप्त

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी व वनरक्षक घेरडी यांनी घेरडी नियत क्षेत्रात फिरती करत असताना दि.19.01.2026 रोजी सदर टेम्पो क्र.MH 45 AF 1123 चा तपास केला असता यामध्ये लिंब जळावु लाकुड, एकुण – 11.34 घ.मी मिळून आला. विनापरवाना कडूलिंब जळावु लाकुड वाहतूक करत असताना जप्त केला.

 

जवळा ते वाकी घेरडी रस्ता येथे फिरती करत असताना दि.19.01.2026 रोजी वाहनाची तपासाणी केली असता टेम्पो क्र.MH 45 AF 1123 मध्ये कडूलिंब जळावु लाकुड 11.34 घ.मी विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसुन आले. वाहन चालक पिंटु विठ्ठल सुतार रा. घेरडी ता. सांगोला यांचेकडे वनविभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना नसल्याचे दिसुन आले. पंचनामा, जबाब, कागदपत्रे केली. जप्त लाकूड नाल अंदाजे 04 टन व किंमत अंदाजे 16000/- होईल. 1) कांतया संगया स्वामी रा.घेरडी टेम्पो मालक 2) पिंटु विठ्ठल सुतार रा. घेरडी टेम्पो चालक यांनी विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक केले बद्दल लाकुड नालासह टेम्पो जप्त केला. या दोन व्यक्तीवर वनरक्षक घेरडी यांनी प्रथम वनगुन्हा क्र.ओ-01/2026 दि.19.01.2026 यानुसार वनगुन्हा नोंद केला आहे.

 

वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी. अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. सागर विलास मगर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा व वृक्षतोडीची परवानगी घ्यावी. प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा. तसेच सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. वृक्षतोड बंद करून व जास्तीत जास्त वृक्षलागवड करून सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त मुक्त करता येईल असे आव्हान श्री. सागर विलास मगर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. सागर विलास मगर यांचा मोबाईल नंबर 8788605476 वर संपर्क साधावा. असे आव्हान केले आहे.

 

सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक, सोलापूर ए.बी. शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिकारी सांगोला व एस. एल. वाघमोडे वनपाल जुनोनी, वनरक्षक घेरडी एस.एस. मुंढे यांनी केली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??