आपला जिल्हा

भिम जयंती नाचुन तर साजरी केली‌ जातेच जाते…परंतु विविध उपक्रमाने सुध्दा जयंती साजरी केली जाते..

बाळू गंगणे 

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.९८८१५८३९३५

 

सध्या विश्वरत्न पं.पु.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती महोत्सव संपूर्ण भारतासह जगातील अनेक देशात सुध्दा साजरा केला जात आहे.

विशेषता भारतामध्ये प्रत्येक राज्यात भिम जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.अनेक शहरात व गावात भिम जयंती निमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात आहेत.लहान लहान गावात सुध्दा भिम जयंतीचा माहोल‌ व‌ उस्ताह पहावयास मिळत आहे.

     भिम जयंतीचा हा माहोल व‌ उस्ताह पाहुन काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांना काही वाईट वाटत असेलही…

जयंती म्हटलं की तरुणांचा सहभाग आसतो परंतु इथे तरुण तरुणी बरोबर वयस्कर पुरुष व महीलांचा सहभाग लक्षणीय असतो विशेषता लहान मुले सुध्दा भिमाच्या गाण्यावर नाचताना पहावयास मिळत आहेत.एवढा उस्ताह भिम जयंतीचा असतो.मग एवढा सहभाग पाहुन कदाचित काहींना वाईट वाटत असेल..मग आसे उपदेश करणारे लोक भिम जयंती आली की..पावसाळ्यातल्या छत्री प्रमाणे उगवतात व उपदेश करतात.आसे उपदेश करणारे लोक भलेही   

  हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत पण हे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून भिम जयंती नाचुन नाही तर वाचुन साजरी केली पाहिजे असे उपदेशाचे डोस एप्रिल महिन्यात पाजत असतात..यांना हे माहीत नाही ६ डिसेंबर रोजी महापरीनिर्वाण दिनी चैत्यभुमिवर दिड कोटी रुपयांची पुस्तके विकली जातात.हे मात्र उपदेश करणारे सांगत नाहीत.

   अहो भिम जयंतीला आंम्ही कायद्याचे व नियमांचे पालन करीत भिम जयंती साजरी करीत आसतो. भिम जयंतीला सगळ्याच ठिकाणी कायदे व नियम पाळले गेले जातात.तरीही हे लोक रभिम जयंती नाचुन नाही तर वाचुन साजरी केली पाहीजे आसे उपदेशाचे डोस सोशल मीडियावर देतच असतात..शेवटी उपदेश कारणारांचे दुखणे त्यांनाच माहीत..

   भिम जयंती आली की की नाचुन नाही वाचुन साजरी केली पाहीजे हे सांगणारे काही चांगले व अभ्यासु लोक सुध्दा आहेत नाही असे नाही. त्यांचा हेतू सुध्दा साफ आसतो ते चांगल्या हेतूने सांगत असताना मात्र हे ही सांगायला विसरत नाहीत की भिम जयंतीला अनेक उपक्रम राबवले जातात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात,विविध स्पर्धा घेण्यात येतात.आभ्यासपुर्ण व्याख्याने आयोजित करण्यात येतात.आसे उपक्रम चांगल्या भावनेने उपदेश करणाऱ्यांना दिसतात व ते बोलतात ही मात्र काही पोटसुळ असलेले लोक मात्र या गोष्टी नजरेआड करून नाचुन नाही वाचुन जयंती साजरी केली पाहीजे एवढाच उपदेश देत असतात..भावांनो भिम जयंती ही एकट्या समाजाची किंवा एका जाती धर्माची नसते हे गावोगावी पहावयास मिळत असते.सर्व धर्माचे लोक भिम जयंती मध्ये सामील होत असतात..कारण प्रत्येक भारतीयांना जाणीव आहे की विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपण सारे भारतीय एकसंघ आहोत…आपण संविधानामुळे मोकळा श्वास घेतोय, संविधानामुळे आपण सुरक्षित आहोत , संविधानामुळे आपल्या महीलांना समान हक्क व न्याय मिळाला आहे यंम्हणुन भिम जयंती आनंदाने हे सर्वजण नाचुन साजरी करत आसतात व सामील होत असतात.कारण बाबासाहेबांनी लिहलेले संविधान सगळ्यांसाठी आहे…संविधानामुळे आपण सर्व भारतीय एकत्रीत पणे राहात आहोत.मग हा आनंद नाचुन साजरा केला तर त्यात काय वाईट वाटण्यासारखं आहे….भिम जन्माचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आनंदाचा , स्वाभिमानाचा दिवस असल्याने आपण तो दिवस नाचुन साजरा करतो.

 

    ▪️मा.बाळू गंगणे▪️

 

     ▪️अध्यक्ष

भिमरत्न तरुण मंडळ डिकसळ▪️ 

 

 

   ‌

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??