नाझरे पोलीस स्टेशनला वाली कोण….?* नागरीकातून प्रश्न..

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
विषारी दारुमुळे पुण्यात अनेकांचे बळी गेले व या दारूमुळे एक प्रकारे केलेली हत्याच आहे व कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री आणि ग्वाही दिली खरी परंतु नाझरे ता. सांगोला सारख्या ग्रामीण भागात ही आज 30 ते 40 रुपयाच्या रसायन मिश्रित सिंधी दारू विक्रीमुळे अनेकांना मृत्यू सामोरे जावे लागत आहे व अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.
रसायन मिश्रित शिंदी दारू पिण्याने हजारोंचे संसार धुळीस मिळाले आहेत व अनेक जण मृत्यू सामोरे जात आहेत परंतु याची नोंद आगर गणना होत नाही, मूळ शिंदी मध्ये वाढ करून जास्त फायदा व्हावा आणि ती अधिक स्ट्रॉंग व्हावी यासाठी रसायन मिश्रित शिंदी तयार करून नाझरे येथे विकली जात आहे व यामुळे मेंदू निकामी होणे, हृदय बंद पडणे आगर किडनीसह, उलट्या, मळमळ, तीव्र डोकेदुखी, आंधळेपणा अशा सर्व अवयवावर याचा परिणाम होत आहे असे नागरिकात बोलले जात आहे व यामुळे अनेक नवयुवकांचे भविष्य उध्वस्त होताना दिसत आहे व यावर पोलीस कधी कारवाई करणार असा सवाल पालक व नागरिकांमधून विचारला जात आहे.
*नाझरे पोलीस स्टेशनला वाली कोण….?*
पुण्यात गावठी दारुणे अनेक निष्पाप नागरिकाचे बळी गेले व संपूर्ण महाराष्ट्र हादरला परंतु नाजरे सारख्या ग्रामीण भागात ही अवघे वीस ते तीस रुपयात रसायन युक्त शिंदी मिळत असल्याने अनेकांच्या मृत्यूचा सौदाच होतय व आता अन्न प्रशासन युक्त अधिकारी मुंडे साहेब कधी धाड टाकतील सांगता येत नाही असे नागरिकात बोलले जात आहे. नाझरे हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व संतांची भूमी असून, तालुक्यात मोठे गाव आहे त्यामुळे दररोज पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. व येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गेली पंधरा दिवस झाले चार्ज घेऊन स्वागत समारंभ झाला खरा परंतु त्यांचे सांगोलातूनच काम सुरू आहे व त्यामुळे नाझरे पोलीस स्टेशनला वाली कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत व त्यामुळे अंधेरी नगरी चौपट राजा अशी परिस्थिती सध्या तरी आहे. व जनतेच्या आरोग्याची खेळ खपवून घेणार नाही असा इशाराही आयुक्त मुंडे साहेब देतात खरे परंतु ग्रामीण भागात याचे अजूनही विदारक चित्र सध्यातरी दिसत आहेत व त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी नाजरे पोलीस स्टेशनला वेळ देऊन अवैध धंदे व शुक्रवारी बाजारात होणारी वाहनाची गर्दी रोखणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकात बोलले जात आहे. तसेच वाहनाच्या होणाऱ्या गर्दीमुळे अनेकांनी नाजरे मार्ग येण्याचा व जाण्याचा बंद केला आहे तरी यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे कारण याचा बाजारपेठेवर परिणाम होत आहे.


