ताज्या घडामोडी

दुर्लक्षित वीज बॉक्स अखेर सुरक्षित; शाखा अभियंता अक्षय बनसोडे यांच्या कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक!

सांगोला विशेष प्रतिनिधी  

विकास गंगणे

मो.9881583935

 

डिकसळ (ता. सांगोला) येथील गावठाण परिसरात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरखाली असलेल्या वीज वितरणाच्या बॉक्सचा दरवाजा गेल्या काही महिन्यांपासून उघडाच होता. या बॉक्समध्ये वीजपुरवठ्याशी संबंधित फ्युज, वायर तसेच इतर विद्युत साहित्य असल्याने उघड्या बॉक्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः लहान मुले व परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विद्युत अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

 

या समस्येची माहिती घेरडी महावितरण शाखेचे शाखा अभियंता अक्षय बनसोडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने या बाबीकडे लक्ष दिले. ट्रान्सफॉर्मरखालील संबंधित वीज बॉक्सची पाहणी करून त्यामधील फ्युज, वायर व इतर विद्युत साहित्याची तपासणी केली. त्यानंतर बॉक्सचा दरवाजा व्यवस्थित बसवून तो सुरक्षित करण्याची कार्यवाही करण्यात आली.

 

गेल्या काही महिन्यांपासून उघड्या अवस्थेत असलेल्या या बॉक्समुळे संभाव्य धोका निर्माण झाला होता. मात्र, ही बाब निदर्शनास आल्यानंतर शाखा अभियंता अक्षय बनसोडे यांनी पुढाकार घेत आवश्यक ती दुरुस्ती केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

वीज यंत्रणेशी संबंधित अशा छोट्या वाटणाऱ्या बाबींकडे वेळेत लक्ष दिल्यास मोठे अपघात टाळता येऊ शकतात. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल डिकसळ ग्रामस्थांमधून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??