जवळा जिल्हा परिषद गटात सुर्यादित्य साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा धुरळा ; सोशल मीडियावर तरुणाईचा भक्कम पाठिंबा
गटातील होम टू होम प्रचाराने प्रचारांत घेतली निर्णायक आघाडी

सांगोला /विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
हो.9881583935
शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गट प्रणित सांगोला तालुका विकास आघाडीचे जवळा जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सुर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. जवळा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात होम टू होम प्रचार करून सूर्यदित्य उर्फ यशराजे यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे.
जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सूर्यादित्य साळुंखे यांच्या रूपाने साळुंखे पाटील कुटुंबाची तिसरी पिढी समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाली आहे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सक्षमपणे चालवला आहे समाजसेवा आणि राजकारणाचे हेच शिवधनुष्य घेऊन ॲड. यशराजे साळुंखे पाटील आता मैदानात उतरले आहेत. यशराजे हे स्वभावाने अत्यंत नम्र, सुसंस्कृत, मितभाषी आणि लगेचच सर्वसामान्य लोकांत मिसळत असल्याने त्यांना प्रचारांत लहान मुले, तरुण मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वतः उच्चशिक्षित आहेत आणि जवळा जिल्हा परिषद गटाच्या विकासाचे व्हिजन घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास ते आपल्या प्रचारादरम्यान लोकांना देत आहेत.
चौकट ;
१) यशराजेच जवळा गटात यशस्वी होणार..!
यशराजे यांच्या रूपाने साळुंखे पाटील कुटुंबाची तिसरी पिढी समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाली आहे. गेली ५० हून अधिक वर्षे हे घराणे लोकांची प्रामाणिकपने सेवा करत आहे. यशराजे स्वतः उच्चशिक्षित सुसंकृत आणि अत्यंत नम्र आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत. त्यांच्याकडे बोट दाखवायला विरोधकाला जागा नाही त्यामुळे जवळा जिल्हा परिषद गटात सुर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील हेच यशस्वी होतील.
; बाळासाहेब पाटील
२) २४ तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार
आजोबा आणि वडिलांकडून मला समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू मिळाले तर, आजीकडून मला आध्यात्मिक संस्कार मिळाला आहे. गेल्या ५० हून अधिक वर्षे आमचे कुटुंब निरपेक्ष भावनेने जनतेची सेवा करत आले आहे. जनतेची सेवा करत असताना आम्ही कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या नाहीत किंवा कोणताही राजकीय स्वार्थ पाहिला नाही. आगामी काळातही वर्षातील ३६५ दिवस आणि दिवसातील २४ तास आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी बांधील राहू.



