जवळा – भोपसेवाडी मार्ग नराळे रस्त्यावर मृत्यूची टांगती तलवार ! खड्यात डांबर न’ टाकता खडीकरण , अनेक ठिकाणी खड्डे जैसे थे तैसे . रस्त्याची झाली चाळण,

सांगोला विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.९८८१५८३९३५
ठेकेदाराचे खिसे भरले, पण जनतेचे मात्र कंबरडे मोडले; चक्का जामचा
मार्गाच्या दुरावस्थेबाबतचा आक्रोश आता शिगेला पोहचला आहे. आपण या रस्त्याची दयनीय अवस्था पाहिली, समोर येणारी वस्तुस्थिती अधिक भयावह आहे. एकीकडे आमदार डॉ .बाबासाहेब देशमुख आणि आजी माजी आमदार यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना, दुसरीकडे हा महत्त्वाचा दुवा असलेला रस्ता मात्र प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे.
या खड्ड्यांमागे लपलेला भ्रष्टाचार आणि सामान्यांच्या खिशाला बसणारा कात्रीचा फटका या कडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. रस्त्याची चाळण झाली असतानाही याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष आहे , यालाच काय विकास म्हणायचे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
आमदार बाबासाहेब देशमुख,आजी माजी आमदार
साहेब यांच्या कार्यक्षेत्राचा हा सीमावर्ती भाग असल्याने, हा रस्ता नेमका दुरुस्त कोणी करायचा, या तांत्रिक वादातच प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
प्रशासनाचा निधी जातो कुठे ?
रस्ते विकास आणि देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी मंजूर होतो, मग जवळा भोपसेवाडी ते नराळे मार्गावर केवळ मलमपट्टी का केली जाते?
ठेकेदारावर मेहेरबानी का? निकृष्ट
खड्डे बुजवण झाल्यानंतर काही दिवसांनी रस्ता उखडणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकले जात नाही? त्याच्यावर कोणाचे वरदहस्त आहेत?
लोकप्रतिनिधींचे यावर मौन का? आपल्या मतदारसंघातील जनता धुळीने माखली जात असताना आणि अपघातात प्राण गमावत असताना लोकप्रतिनिधी विधानसभेत किंवा लोकसभेत हा प्रश्न लावून का, धरतील का?
विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल कोणाचे पातक?
नराळे व जत भागातून परिसरातून जवळा व सांगोल्याला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोटरसायकल आणि बस वारंवार नादुरुस्त होत आहेत. शिक्षणाची ओढ असणाऱ्या या तरुणांना रस्त्यातील खड्ड्धांनी मुलांच्या शिक्षणाला च थकवा दिला आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, एखाद्या गरोदर मातेला किंवा गंभीर रुग्णाला दवाखान्यात न्यायचे असल्यास हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे.
प्रशासनाला जर रस्ता दिसत नसेल, तर आम्ही खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून तुमची नाकर्ते गिरी चव्हाट्यावर आणू. आता फक्त ‘चक्का जाम हाच एकमेव पर्याय उरला आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास या मार्गावर बेशरमची झाडे लावून आंदोलन करण्याचा इशाराही युवक वर्गाकडून देण्यात आला आहे. आता तरी आमदार बाबासाहेब देशमुख,माजी आमदार शहाजी बापू पाटील ,माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील या गंभीर प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
▪️तंटामुक्ती अध्यक्ष अशोक करताडे एक संतापलेला स्थानिक नागरिक▪️
आता थेट आरपारची लढाई!
केवळ बातम्या आणि सोशल मीडियावरून तक्रारी करून प्रशासन हलत नसल्याने, आता परिसरातील ग्रामस्थांनी चक्का जाम आंदोलनाचे हत्यार उपसण्याचे ठरवले आहे. जर पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर हा रोष रस्त्यावर उतरेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



