ताज्या घडामोडी

घेरडी परिसरातील तलाव भरण्यासाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

सांगोला विशेष प्रतिनिधी 

विकास गंगणे 

मो.९८८१५८३९३५

 

म्‍हैशाळ योजनेमधून मौजे घेरडी परिसरासह घेरडी-पारे तलाव तसेच अन्य तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी घेरडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. म्‍हैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही टेलपर्यंत पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

म्‍हैशाळ योजनेमधून घेरडी परिसर व घेरडी-पारे तलाव तसेच अन्य तलाव भरण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. मात्र, योजनेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही टेलपर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे घेरडी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील शेतकऱ्यांकडे जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः गायींसाठी पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.

शासनाने पुराचे पाणी दुष्काळ व पावसाने न पडलेल्या तालुक्याच्या भागांना देण्याचे आदेश दिलेले असतानाही सांगोला तालुक्यास पाणी देण्यात आलेले नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे अत्यंत मोठे नुकसान होत असून, शासनाच्या आदेशाप्रमाणे पुराचे पाणी घेरडी गावाला दिले जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडे तातडीची मागणी

यापूर्वी शेतकऱ्यांनी तहसीलदार, म्‍हैशाळ योजना प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊनही घेरडी गावाला पाणी मिळाले नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत खेदजनक असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. घेरडी परिसरातील सर्व तलाव व परिसरासाठी म्‍हैशाळ योजनेमधून पुराचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाणी न आल्याने उपोषण 

 सर्व शेतकरीवर्गाच्या वतीने सांगोला तहसीलदार कार्यालयासमोर दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून उपोषण करण्यात आले आहे, हे निवेदन देण्यात आले आहे.

चौकट : निवेदनाच्या प्रती संबंधितांना

शेतकऱ्यांनी या मागणीची माहिती व निवेदनाच्या प्रती संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मा. आमदार बाबासाहेब देशमुख (विधानसभा सदस्य, सांगोला), मा. पोलीस निरीक्षक, सांगोला (पोलीस स्टेशन सांगोला), मा. कार्यकारी अभियंता (म्‍हैशाळ पंपगृह विभाग क्र. २, सांगली), मा. सहायक कार्यकारी अभियंता (म्‍हैशाळ कालवा क्र. ९, सांगोला) 

चेतनसिंह केदार सावंत 

यांचा समावेश आहे.

 घेरडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचा इशारा:

पाणी अत्यावश्यक आहे; दोन दिवसांत तलाव व परिसरासाठी पाणी सोडले नाही, तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.

या उपोषणा वेळी घेरडी गावचे मा.सभापती अनिल मोटे,मा.सरपंच दिलीप मोटे,बयाजी लवटे तसेच भाऊसो यमगर आप्पासो सरगर आसपास गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??