पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आश्वासनानंतर घेरडी परिसरातील शेतकऱ्यांचे उपोषण मागे… ॲड सचिन देशमुख यांच्या प्रयत्नाला यश..

सांगोला / विशेष प्रतिनिधी
विकास गंगणे
मो.9881583935
घेरडी ता. सांगोला येथील शेतकऱ्यांनी म्हैशाळचे पाणी पारे व घेरडी परिसरात मिळावे या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणास सुरुवात केली होती, पानंद रस्ते सांगोला तालुका सहअध्यक्ष व ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांना पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे हे सांगितले व म्हैसाळचे पाणी त्वरित घेरडी परिसरात सोडून शेतकऱ्यांना न्याय द्या ही भूमिका घेतली होती यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना व शेतकऱ्यांना फोनवरून संपर्क साधून हा प्रश्न सोडविला त्यामुळे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. देशमुख वकील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्र शासन जागृत असून मुख्यमंत्री देवा भाऊ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सदर प्रसंगी मा. सभापती बाळासो काटकर, जि प सदस्य दादासाहेब लवटे, मा जि.प. सभापती अनिल मोटे, यमगर सर, बयाजी लवटे, आप्पासो सरगर, बाळासाहेब मोटे, बिरा पुकळे, आप्पा मेटकरी, मेटकरी सर, प्रांत माळीसो, तहसीलदार भागवत मॅडम, महेश शेळके इंजिनियर नलवडे, पवार , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार सचिन देशमुख यांनी मानले.



